मुंबई | सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शंका व्यक्त केली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला सोशल मीडियावरुन समजलं. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचे मृतदेह सापडलेत- राजेश टोपे
“अजित पवारांना मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबाबत मुक्ता टिळक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
“पवार साहेबांचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी पाटलांना…”
सोनू सूदला उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कारवाई होण्याची शक्यता