दलित तरुणांची धरपकड थांबवा, संभाजी भिडेंना अटक करा!

मुंबई | महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांनी दलित तरुणांची धरपकड सुरु केली आहे, ती तात्काळ थांबवावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली तसेच आमच्या मागण्या मान्य केल्या. मात्र कारवाई करुन मुख्यमंत्र्यांनी लोकांना विश्वास द्यावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

संभाजी भिडेंना अटक होत नाही ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना सरकार अटक करणार का?, असा सवालही आंबेडकर यांनी यावेळी विचारला.