Maharashtra l राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापताना दिसत आहे. वाशिमच्या पोहरादेवी येथील सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलं होत, त्यामुळे राजकारणाला पुन्हा एकदा वेगळी दिशा मिळाली आहे.
मराठा कुणबीपासून सावध राहा; प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य :
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, वाशिमच्या पोहरादेवी येथील सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा व कुणबी उमेदवाराला ओबीसी मतदारांनी मतदान करू नये, तसेच मराठा कुणबीपासून सावध राहा असं खळबळजनक वक्तव्य केलं होत. यासंदर्भात प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी सवाल उपस्थित केला होता.
याप्रकरणी बच्चू कडू हे सवाल उपस्थित करत म्हणाले की, मराठा, कुणबी काय दरोडेखोर आहेत का? तसेच सावध रहा म्हणजे ते लुटरे आहेत का? जर असं काही असेल तर किंवा त्यांनी कदाचित हे पाहिलं असेल त्यांनी सांगितले हे नक्कीच पाहिजे. प्रकाशजी जेव्हा असं बोलता तेव्हा खरं तर फारच दुःख वाटतं अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे.
Maharashtra l प्रकाश आंबेडकरांनी दिल चोख प्रत्युत्तर :
प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्यात मराठा कुणबीवरून रंगलेल्या वादात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना चोख उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ज्यांना जे कळत नसेल त्यांनी माझ्या मतांना काहीही बोलू नये.
तसेच प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, जेव्हा मी काही बोलत असेल आणि ते समजून घेऊन बोलले तर मला वाटतं त्याला उत्तर देणे मी उचित समजतो. अन्यथा मी काही गोष्टींना इग्नोर करत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
News Title : Prakash Ambedkar Against On Bacchu kadu
महत्त्वाच्या बातम्या-
LIC ने सादर केल्या दोन भन्नाट योजना; या लोकांना मिळणार खास सुविधा
सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
धाराशिवच्या हॉटेलमध्ये राडा; राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले
आवडीने चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान; रिसर्चमध्ये झाला धक्कादायक खुलासा
Diabetes असणाऱ्या रुग्णांनी ‘हे’ ड्राय फ्रूट्स खाऊ नये; अन्यथा..