Prakash Ambedkar | मनुस्मृतीवरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. सरकारने इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करणार असल्याचं सांगितलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्या समता परिषदेनं देखील विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दुपारी दहन केलं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर अनावधानाने फाटला गेला. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं आहे.
मनुस्मृती ही मनातून जाळणं गरजेचं असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला होता. बुधवार (29) मे रोजी जितेंद्र आव्हाड हे महाड येथील चवदार तळे येथे गेले होते. याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी चवदार तळे येथे जात मनुस्मृतीचे दहन केलं. त्यावेळी अनावधानाने मनुस्मृतीचे पोस्टर फाडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो फाटला गेला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. (Prakash Ambedkar)
जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली
जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी माफी मागितली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “आम्ही मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी आलो होतो. त्यामध्ये महिलांबाबत अगदी खालच्या स्थरावर लिहिलं आहे. मनुस्मृतीचे हेच श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करू नये. यासाठी आमचा विरोध आहे. यावेळी पोस्टर फाडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर फाटल्याने मी महाराष्ट्राची माफी मागतो”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. यानंतर आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच सुनावलं आहे.
“मनुस्मृती मनातून जाळणं गरजेचं”
“आंधळेपणाने आंदोलन केल्याने आंदोलन होत नाही. तसेच मनुस्मृती जाळल्याने मनुस्मृती मरत नाही. तर त्यात काही कृती केल्याने मनुस्मृती संपते. मनुस्मृती ही मनातून जळणं गरजेचं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. याच कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो,” असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.
फोटो फाडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनुस्मृती फाडत असताना अनावधानाने डॉ. बाबासेहब आंबेडकर यांचा फोटो फाटला गेला. मनुस्मृती पोस्टरवरील नाव फाडण्याच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याने पोस्टर फाडला गेला नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केला जाणार असल्याचा सरकारने निर्णय घेतला. याविरोधात महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यापासून विरोध केला. तर त्यानंतर समता परिषदेने देखील याविरोधात आवाज उठवला.
News Title – Prakash Ambedkar Aggressive On Jitendra Awhad About Dr. Babasaheb Ambedkar Photo
महत्त्वाच्या बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी!
“इंडिया आघाडीचं सरकार बनताच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल”
“लोकसभा निकालानंतर 6 महिन्यातच राजकीय..”; PM मोदींचा सर्वात मोठा दावा
डॉ. अजय तावरेंचा पाय आणखी खोलात; जुनं प्रकरण समोर आल्याने खळबळ
“अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे, त्यांच्यामुळे..”; पुणे अपघातप्रकरणी नवी माहिती समोर