बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका

मुंबई | शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये, अशा शब्दात अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारमध्ये संवेदनशीलता अजिबात राहिलेली नाही. सरकारने अजिबात मदतीकडे लक्ष दिलं नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार मोडून पडलेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एकरकमी पैसे खर्च करण्याचे आदेश द्यावेत, असं आंबेडकर म्हणाले.

वेधशाळेने अंदाज वर्तवल्यानंतरसुद्धा शासनाने आवश्यक दखल घेतली नाही. शासनाने आतातरी मदतकार्यासाठी नेटाने पुढे यायला हवं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, विविध संस्था आणि आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते मदतीसाठी धावून जात आहेत तर सरकारचे प्रतिनिधी फक्त फेऱ्या मारण्याचं काम करत आहेत, असं टीकास्त्र त्यांनी यावेळी सरकारवर सोडलं.

महत्वाच्या बातम्या-

“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”

-“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”

-ब्रह्मनाळ दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांची माहिती

-सरकारने निर्लज्जपणाचा कळस केलाय- अशोक चव्हाण

-महापुरामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकला; राज ठाकरे यांची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More