…अन् हे संविधान वाचवणार?, मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची कॉँग्रेसवर टीका

Prakash Ambedkar | विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी काल 12 जुलैरोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवारी निवडून आले आहेत. भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेनेचे 2 उमेदवार असे महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसची 8 मतं फुटल्याने मविआला मोठा धक्का बसला. महायुतीला ठाकरे गट आणि शरद पवार गटाची मते फोडण्यात यश आलंय. या पार्श्वभूमीवरच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं ट्वीट

काँग्रेसने दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसींना मुर्ख बनवले आणि त्यांचा वापर केला. तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असे तुम्हाला वाटते?, असा सवाल आंबेडकर यांनी ट्वीट करत केला आहे.

“राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला क्रॉस व्होट केले.तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असे तुम्हाला वाटते?”, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी कॉँग्रेसला लगावला आहे.

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी

दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार हे विजयी झाले आहेत. योगेश टिळेकर – 26 मते , पंकजा मुंडे – 26 मते , परिणय फुके- 26 मते , अमित गोरखे – 26 मते तसेच सदाभाऊ खोत यांना 24 मते मिळाली आहेत.

तर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन मिळाले होते. पण त्यांना फक्त 12 मते मिळाली. तसेच, ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाले आहेत. या  निवडणूक निकाल संदर्भातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलंय.

News Title-  Prakash Ambedkar Criticism Of Congress 

महत्वाच्या बातम्या-

आज ‘या’ राशीचे लोक होतील मालामाल!

“पंकजा मुंडे यांचा भाजपच्या नेत्यांनीच गेम…”, ‘या’ नेत्याच्या दाव्याने राज्यभर खळबळ

लग्न करायचं तर ‘अशा’ मुलींसोबतच करा; भाग्यही उजळेल आणि कायम आनंदी राहाल

महाराष्ट्रात श्रेयचोरांचा सुळसुळाट!, रोहित पवार आणि रवींद्र धंगेकरांचा उल्लेख

“आपण पुन्हा एकत्र यायला हवं”, संजय राऊतांची महायुतीच्या नेत्यांशी गळाभेट; राजकीय वर्तुळात एकच चर्चा