“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

नाशिक | 10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भाजप दिला आहे. ते नाशिकमध्ये एका सभेत बोलत होते.

फसवायला निघालेले ‘स्वत:च फसलेले’ हे पहिले सरकार आहे. आरक्षणाचा गेम त्यांच्यावरच उलटणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

शिवसेना-भाजपचं भांडण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण आहे. अमित शाह प्रियकर आणि उद्धव ठाकरे प्रेयसी आहे. अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून उद्धव ठाकरेंचे नवे प्रियकर नरेंद्र मोदी हे आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

दरम्यान, डेबिट आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून नोटबंदी केली असल्याचाही आरोप भाजपवर आंबेडकरांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण

-शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

-“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”

-…अन् ‘स्वाभिमानी’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!

-“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”