बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिहार तुरुंगातील छोटा राजन तोंड उघडेल याची पवारांना भीती- प्रकाश आंबेडकर

अकोला |  तिहार तुरुंगात कैद असलेला डॉन छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल तोंड उघडतील याची भीती शरद पवारांना आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलं होतं. हे आव्हान मोदी स्वीकारतील का, असा सवालही आंबेडकरांनी केला आहे. ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते.

निवडणुकीच्या काळात सर्व गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे. त्यामुळे मोदींनी पवारांचं आव्हान स्वीकारावं आणि याबाबतचा खुलासा करावा, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, तिहार जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झोप उडाली आहे, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“सत्ता येण्यासाठी किती खासदार लागतात हे तरी प्रकाश आंबेडकरांना माहित आहे का?”

-विखे-थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रचार कार्यालयाच्या बोर्डवरुन विखे-पाटील गायब

-नरेंद्र मोदी रायफल तरी उचलू शकतात का?; एअर स्ट्राईच्या श्रेयावरुन राहुल गांधींची टीका

-राष्ट्रवादी ‘मनसे’ आणखी जवळ! ‘मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राष्ट्रवादीच्या शुभेच्छा’

-बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; मोदींचे हात बळकट करण्यासाठी ‘हा’ नेता भाजपात प्रवेश करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More