बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शासनाने पुरग्रस्तांना कुठलीही मदत दिली नाही- प्रकाश आंबेडकर

नागपूर | शासनाने पुरग्रस्तांना कुठलीही मदत दिली नाही. एकीकडे पुरजन्य परिस्थिती निर्माण होत असताना भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री निवडणूक प्रचाराच्या यात्रेत व्यस्त होते, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे.

पुरग्रस्तांना ताबडतोब मदत निधी म्हणून खावटी देण्यात येते ती ही देण्यात आलेली नाही. मंत्री, आमदार पुरग्रस्त भागात भेटी देत असल्याने प्रशासन त्यांच्यामागे फिरत आहे. पण अशाने पुरग्रस्तांना मदत मिळत नाही, असंही आंबेडकर म्हणाले.

मंत्री पुरग्रस्त भागात पर्यटनासाठी जातात. ते पुरस्थितीबाबत गंभीर नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

कर्नाटकच्या अलमट्टी धरणात पाणी अडवलं जात असल्याने पूरस्थिती निर्माण होते.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले”

-काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि सोनिया-राहुल बैठकीतून बाहेर…!

-प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका

“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”

-“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More