बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था दारुड्या सारखी झालीये”

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केलीेये.

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे, असं ते म्हणालेत.

दरम्यान, महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचं निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More