बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी स्टेडियम आपल्या नावावर करून घेतलं”

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते त्यावेळी त्यांनी भारतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठं एक स्टेडियम असायला पाहिजे असं स्वप्न पाहिलं होतं. क्रिकेट म्हटलं की, भारताचं नाव अग्रेसर येतं. भारतात सर्वात जास्त क्रिकेट बघितला तसेच खेळला जातो.

काल भारत आणि इंग्लंडच्या कसोटी सामन्यापूर्वी जगातील सर्वात मोठया स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या स्टेडियमच्या नावावरून सध्या मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. पूर्वी सरदार वल्लभभाई पटेल असं नाव ठरलेल्या स्टेडियमला नरेंद्र मोदी असं नव्याने नाव देण्यात आल्याने अनेक राजकीय नेत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल या स्टेडियमचं उद्घाटन केलं आहे. “देशाला काय नेता मिळाला आहे, लोक यांना विसरून जातील याची त्यांना भीती आहे. यामुळे, मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावाचे करून घेतले आहे” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी  नरेंद्र मोदी सरकारवर केली आहे. ट्विटर च्या माध्यमांतून त्यांनी ही टीका केली आहे.

उद्घाटन समारंभप्रसंगी या स्टेडियममुळे अहमदाबादची जागतिकस्तरावर वेगळी ओळख तयार होईल असं राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. तसेच येणाऱ्या 6 महिन्यात या स्टेडियमचे काम पुर्ण होईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मजबूत शिवसेना पक्षप्रमुख ते मजबूर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा वर्षभराचा प्रवास”

“चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना निवडणुकीत उभं केलं होतं”

“…तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता येईल”

“मुख्यमंत्री संवेदनशील, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रिमंडळातून हाकलून देतील”

मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, …तर पेट्रोल-डिझेलची किंमत निम्म्या होतील?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More