“संविधानावर खरंच प्रेम असेल, तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी मनुस्मृती जाळावी”

Prakash Ambedkar | भाजपाने देशात आणीबाणी जाहीर केलेला दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून कॉँग्रेसने जोरदार हल्ला केला आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांना थेट आव्हानच दिलं आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संविधानावर खरोखरच प्रेम असेल तर, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी मनुस्मृती जाळावी, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केली मागणी

“भाजप आणि काँग्रेसने राज्यघटनेवर वार करून उपेक्षित व वंचित जाती व समाजाचे वेळोवेळी शोषण केले आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या आदर्शांना आणि राज्यघटनेतील मूल्यांना भ्रष्ट केले आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही राज्यघटनेवर खरोखर प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याची मागणी करतो.”, असं ट्वीट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलंय.

प्रकाश आंबेडकर यांची ही मागणी आता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी पूर्ण करतात का, हे पाहावं लागेल. दरम्यान, भाजपच्या या निर्णयावर राहुल गांधी हे चांगलेच संतापले आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील टीका केली आहे.’जेव्हा मध्य प्रदेशातील भाजपचा नेता आदिवासींवर लघवी करतो, जेव्हा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या दलित मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले, तेव्हा ही संविधानाची हत्या नाही तर काय आहे?’, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींना केला आहे.

कॉँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

तर, काँग्रेस नेते विवेक टंखा म्हणाले की, भाजप निराशेमधून 50 वर्षे जुना मुद्दा मांडत आहेत. 1975 ची घटना मांडणे हे भाजपची निराशा दर्शवते. तसेच काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी देखील यावर भाष्य केलं. गेल्या महिन्याच्या चौथ्या दिवशी भाजपला 440 व्होल्टचा एवढा करंट आला की, 400 चे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या 240 पर्यंत कमी झाली. राज्यघटना बदलण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.त्यामुळे आता संविधान हत्या दिनाची चर्चा आहे.

25 जून ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित

दरम्यान, मोदी सरकारने अधिसूचना जारी करून 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती, त्यावेळच्या सरकारने सत्तेचा प्रचंड गैरवापर करून भारतातील जनतेवर अतिरेक आणि अत्याचार केले होते. या काळात ज्यांनी लढा दिला, त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारत सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला असल्याचं या अधिसूचनामध्ये म्हटलं आहे.

News Title – Prakash Ambedkar demand to burn Manusmriti

महत्त्वाच्या बातम्या-

“मतदारांना धमकावून विजय?”; नारायण राणेंच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान

“प्रत्येक आमदाराला 5 कोटींची ऑफर आणि..”; विधान परिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा दावा

कोट्यवधींचे दागिने, सोन्याचा लेहंगा..राधिकाच्या राजेशाही थाटाची एकच चर्चा; किंमत ऐकून चक्रावून जाल

अनंत-राधिका अडकले विवाहबंधनात; लग्नाचा पहिला फोटो आला समोर 

…अन् हे संविधान वाचवणार?, मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची कॉँग्रेसवर टीका