सोलापूर | सत्तेसाठी दंगली घडवणं हाच भाजपचा बेस आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून दर तीन-चार महिन्याला सामूहिक अत्याचाराची घटना घडत आहे. मुले पळवणारी टोळी दाखल झाल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेक भागात हत्येच्या घटना घडल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पुनर्वसनासाठी त्यांना बागायती शेतजमिनी द्यायला हव्यात, मात्र सरकारकडून भलत्याच मुद्यांवरून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-…तर भारतात आणलं तर त्याला फाशीच द्या; शिवसेनेची मागणी
-भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?
-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे
-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील
-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?