पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

पंढरपूर | भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते. 

पुढच्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्रीपदावर राहतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

आता मुख्यमंत्र्यांनी काय नाटकं करायचीत ती करावी, त्यांची पुन्हा सत्ता येणार नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन

-…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!

-भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

-असशील तू शिवसेनेचा आमदार, माझ्याशी जोरात बोलायचं नाही!

-राजकीय आरक्षण द्यावे लागेल म्हणून धनगरांना आरक्षण दिलं नाही!