प्रकाश आंबेडकरांकडून महाराष्ट्र बंद मागे घेण्याची घोषणा

प्रकाश आंबेडकरांकडून महाराष्ट्र बंद मागे घेण्याची घोषणा

मुंबई | राज्यात सुरु असलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

परिस्थिती बिघडवण्यामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. याकूब मेमनला जो न्याय दिला तोच न्याय भिडे गुरुजी आणि एकबोटेंना द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

बंद शांततेत पार पाडण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं. ते आश्वासन आम्ही पाळलं, किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पाडल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

Google+ Linkedin