संघाकडे AK-47 आली कुठून?; सरसंघचालक मोहन भागवतांवर मोक्का लावा!

मोहन भागवत, सरसंघचालक

मुंबई | संघाकडे एके 47 रायफल कुठून आली? असा सवाल करत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मुंबईतील अमरज्योत येथे भारिपकडून शांतता आंदोलन पुकारण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कोणाकडे शस्त्रं सापडली तर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाते, मग मोहन भागवतांवर कारवाई का नाही?, असा सवाल त्यांनी विचारला. 

दरम्यान, मोहन भागवत यांच्यावर कारवाई झाली नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही- मुख्यमंत्री

-राष्ट्रवादीने भाजपवर आरोप केले, मात्र आता आव्हान स्वीकारणार का?

-#MeToo | पत्रकार इतक्याही काही निरागस नसतात; भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य!

-मनसेच्या इंजिनात पुन्हा इमकमिंग सुरू; शिवसेना,राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

-…असं छापलं जात असताना राज्याचं शिक्षण खातं झोपा काढत होतं का?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या