‘राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार’, बड्या नेत्याचा मोठा दावा

Prakash Ambedkar | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र त्यावर राज ठाकरे यांनी मौन सोडत सांगितलं की, मी शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. त्यानंतर आता याच मुद्द्याला धरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरे होतील असं वक्तव्य केलं. जर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रमुख झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नये, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भाजपने रेस लावली”

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भाजपने रेस लावली आहे. त्यांच्यात लॉयल्टीवरून चुरस लागलेली आहे. राज ठाकरे यांना प्रचाराला आणलं जात आहे. गरज पडली तर सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील अशी परिस्थिती दिसत आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

मला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची नाही. त्यांना मुस्लिमांनी लोकसभेनंतर तुम्ही भाजपसोबत समजोता करणार की नाही? हे विचारलं होतं. त्यांना उत्तर न देता उद्धव ठकरे मोदींवर टीका करताना दिसत आहेत, म्हणजे हा केवळ दिखावा असल्याचं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

आम्ही आमच्या भरोवशावर आहोत संघाच्या जीवावर नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या शिडीने तुम्ही वर आलात ती शिडी सोडायला तुम्ही तयार आहात. मोदी यांनी मागील दोन वर्षात तुम्हाला भेटायला वेळ दिला का? असा सवाल मी केला असता तेव्हा मोहन भागवत यांनी अद्यापही उत्तर दिलं नाही. आता नड्डा यांचं विधान आलं आहे. त्यावरून सर्व काही स्पष्ट होत आहे, असं आंबेडकर म्हणाले.

“मोदी हे खोटारडे आहेत”

राज्यात भाजपची धांदल उडली आहे. मोदी गल्लीबोळात सभा घेताना दिसत आहेत. आता मोदींची भाषाही बदलत आहे. मोदी संविधान बदलणार नसल्याचं बोलत आहेत. बाबासाहेब आंबेडकर आले नाही तरीही संविधान बदलणार नाही असं मोदी म्हणाले आहेत. मोदी हे खोटारडे आहेत. तुम्ही संविधान बदलणार आहात का? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे, असंही ते म्हणालेत.

मोदी मोदींच्या गॅरंटीबाबत सांगत आहेत. मोदी त्यांची गॅरंटी सांगत आहेत. पण इथे मोदींची गॅरंटी कोणी पाहिली आहे का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

News Title – Prakash Ambedkar On Raj Thackeray Will Shivsena Party Main Leader

महत्त्वाच्या बातम्या

“उद्या RSS लाही नकली म्हणतील”; उद्धव ठाकरे कडाडले

फुलांच्या माळाने स्वागत केलं नंतर थेट कानाखाली वाजवली; कॉँग्रेस नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

‘मोदींवर गुन्हा दाखल करा’, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मलायका अरोराने भाड्याने दिला तिचा फ्लॅट; महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल