Top News

राज ठाकरे या सगळ्याला बळी पडणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांना विश्वास

Loading...

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. भाजपकडून ब्लॅकमेलिंगच राजकारण केलं जातंय पण राज ठाकरे या सगळ्याला बळी पडणार नाहीत, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

जे पक्षात जाणार नाहीत, त्यांच्यापाठीमागे अश्याच प्रकारे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. त्यांनाही असाच त्रास दिला जात आहे, असं आंबेडकर म्हणाले आहेत.

Loading...

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा असं मी बाळा नांदगावकर यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही ते मला माहित नाही, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, 22 तारखेला शांततेत ईडी कार्यालयात जाणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं आहे. तर मी असल्या ईडीच्या नोटीसीला भीक घालत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला धक्का; निर्मला गावित यांचा आमदारकीचा राजीनामा

-बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!

Loading...

-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!

-होय… मला प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच फोन करून सांगितलं होतं; नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या