Top News

संभाजी भिडेच राष्ट्रवादी चालवतात या वक्तव्यावर आजही ठाम- प्रकाश आंबेडकर

अहमदनगर | संभाजी भिडेच राष्ट्रवादी चालवतात या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असं भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार पुरोगामी आहेत. मात्र त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे. राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आमची आघाडी झाली तर ती काँग्रेससोबत असेल. काँग्रेसने कुणासोबत जावे हा त्यांचा प्रश्न आहे. जर आघाडी झाली तर आम्ही फक्त काँग्रेसचा प्रचार करणार, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, १२ जागांच्या मागणीवर ठाम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा नमूद केलं. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर आघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-…तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं ‘गणित’ फिस्कटणार! 

-राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत!

-कांद्याच्या भावासाठी आता शिवसैनिक-शेतकरी रस्त्यावर; महामार्ग रोखून धरला…

-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ‘यांची’ नावं सर्वाधिक चर्चेत! 

युती व्हावी म्हणून गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या