देशाचा पाकिस्तान करायचा असेल तर उदयनराजेंसारख्यांना निवडून द्या!

अहमदनगर | देशाचा पाकिस्तान करायचा असेल तर आगामी काळात खासदार उदयनराजे भोसले यांच्यासारखी आणखी माणसे निवडून द्या, असं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ते कोपरगावमध्ये बोलत होते.

काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत. आगामी काळात सत्ताधारी भाजपची अवस्थाही काँग्रेससारखी होईल, असं म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षावरही हल्ला चढवला.

दरम्यान, बजेट शेतकऱ्यांसाठी आहे हे वास्तव असले तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला ज्या दिवशी चांगला भाव मिळेल, त्याच दिवशी मोदींचा विश्वास सार्थ ठरेल, असंही त्यांनी म्हटलंय.