‘एमआयएम’नंतर आता प्रकाश आंबेडकरांचाही ‘वंदे मातरम्’ला विरोध!

परभणी | ‘एमआयएम’नंतर आता भारिप बहुजन महासंघाने ‘वंदे मातरम्’ला विरोध केला आहे. राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’चा आग्रह कशाला?, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. 

प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

वंदे मातरम् राष्ट्रगीत नाही. त्यामुळे त्याची कुणावरही सक्ती असता कामा नये. भाजपचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे. 

काँग्रेसला बहुजन आघाडी चालत नाही. आघाडीसाठी दोन महिन्यात दिल्लीतून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे आम्ही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आहोत, असं ते म्हणाले.

दरम्यान, धनगर समाजाचा राष्ट्रवादीसोबत आघाडी करायला विरोध आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-या सरकारने जलयुक्त शिवारातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे- सुप्रिया सुळे  

-चंद्रकांत पाटलांनी सांगितला मंत्री होण्याचा फायदा…

-…अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरु; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

-काहीही झालं तरी एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नाही- प्रकाश आंबेडकर

-टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही; शोभा डे यांचे मोदींवर टीकास्त्र