वंचितला राम राम केलेल्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; थेट म्हणाले…

Prakash Ambedkar | लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडत अनेक पक्षांच्या कार्यालयांना भेट दिली. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने पुणे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. मात्र लोकसभा निवडणुकीत वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त झालं. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाला राम राम केला. वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता वसंत मोरे यांच्यावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी हल्लाबोल केला आहे.

वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षातून बाहेर पडत येत्या 9 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन ते शिवबंधन बांधणार असल्याचं म्हटलं आहे.  त्यावर आता पुणे येथील कात्रज येथील वसंत मोरेंच्या कार्यालयाबाहेर नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं आहे. तसेच यावर आता प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वसंत मोरेंच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं आहे.

वसंत मोरेंची भूमिका आयाराम गयाराम

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वसंत मोरेंच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं. ते म्हणाले की, वसंत मोरे यांची राजकीय भूमिका ही आयाराम गयाराम अशी आहे. मोरेंना माणसं ओळखता आली नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने ही गोष्ट घडताना दिसत आहे, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केलं आहे.

राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार आहेत. मात्र गॅसचे भाव कधी कमी होणार आहेत? महिलांना अन्नधान्य पुरणार आहेत का? माझ्या बहिणींची फी भरली जाणार का? असे इतर काही सवाल प्रकाश आंबेडकरांनी केले आहेत.

‘मला माफ करा’ वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज

दरम्यान वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडत असताना वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना ‘मला माफ करा’ अशा आशयाचा मेसेज केला आणि माफी मागितली. तसेच पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यामागील कारण देखील सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंचा संघर्ष हा माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना आकर्षित करतो. तसेच आपण उद्धव ठकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. उद्धव ठाकरे माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील ती मी पार पाडायला तयार असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.

माझ्या मागे असणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी विचार केला. माझ्या कार्यकर्त्यांचा विचार केला आहे. त्यानुसार मी आता ठाकरे गटात जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.

News Title – Prakash Ambedkar On Vasant More

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता अजित पवारही करणार पायीवारी!

मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

“माझा वापर केला, माझी इज्जत..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

धक्कादायक! पुणे शहरात उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला

‘लाडकी बहीण योजने’साठी आता मोबाइलवरून करा अर्ज; ‘या’ स्टेप्स करा फॉलो