अकोला महाराष्ट्र

गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी- प्रकाश आंबेडकर

अकोला | सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही सांगितलं. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लोकांना मदत करावी, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

शासनाने लोकांच्या वागणुकीवरुन परिस्थिती समजून घ्यावी. लोकांना ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी फिजीकल डिस्टन्सिंगची आयशी तैशी केली. यातून त्यांनी आम्ही एकत्र आहोत हे दाखवून दिलं. लॉकडाऊनच्या मानसिक त्रासाची जाणीव लोकांना झाली आहे. त्यामुळे 31 जुलैनंतर लॉकडाऊन वाढला, तर वंचित बहुजन आघाडी शासनाच्या विरोधात जाईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली आहे. राज्य सरकारने आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करुन घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र, ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला रानमोकळ करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘सत्ता पिपासू लोकांमुळे लोकशाही धोक्यात येईल’; राजस्थान सत्ता नाट्यावर प्रकाश राज संतापले

स्टेअरिंग अजित पवारांच्या हातात असलं तरी…- संजय राऊत

“नरेंद्र मोदींसारखं सक्षम नेतृत्त्व नसतं तर 130 कोटी जनता असुरक्षित असती”

दिवसाढवळ्या खून होत आहेत, अजून किती बळी गेल्यावर दिशा कायदा आणणार?- चित्रा वाघ

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या