”होय, आम्ही फाटके आहोत पण आम्ही न्यायासाठी लढतोय”

नागपूर : देशात अजूनही भेदभाव केला जातो. वंचित समूहाला फाटक्या कपडय़ांचे लोक म्हटलं जातं. होय आम्ही फाटके आहोत. ते विसरण्याचा प्रयत्न आम्ही करीत होतो. पण त्याची आठवण करून दिल्याबद्दल त्यांचे आभारच मानायला पाहिजेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सर्वाना न्याय मिळावा, या उद्देशाने आम्ही लढत आहोत. आम्हाला फाटक्या कपड्याचं म्हटलं जात असलं तरी याच फाटक्या माणसांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

अमरावतीमध्ये दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात दाखवलेले धाडस आता देखील दाखवलं पाहिजे. समाजाने श्रद्धेच्या आहारी जाऊ नये, त्याच्या आहारी गेल्याने माणूस गुलाम होतो. वंचित समूहाने आता जागरूक होण्याची, एकत्र येण्याची गरज आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-