Top News

“नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार”

मुंबई | केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेतीसंबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले. या नवीन कायद्यामुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागणार आहे, असं म्हणत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी कायदा मागे घेतला पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 ते 4 या वेळेत धरणे धरणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

बाजार समित्यांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या शेतीमालाचा पुरवठा सरकार स्वस्त धान्य पुरवठा योजनेला करत असते. शेतमाल सरकारने विकत घेतला नाही तर दारिद्र्य रेषेखालील केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना धान्य पुरवठा कुठून करणार?, असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.

थोडक्यात बातम्या-

फेक टीआरपीप्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन!

…तर हे केंद्र सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही- बाबा आढाव

विराट-पुजारासाठी नाही तर ‘या’ खेळाडूसाठी केलाय गेमप्लॅन- टीप पेन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आठवलेंनी केली ही मोठी भविष्यवाणी

राजू शेट्टी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील कार्यालयावर काढणार मोर्चा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या