Prakash Ambedkar | लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडीने एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महायुतीने 17 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आगाडीच्या 30 जागांपैकी ठाकरे गटाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईतील ठाकरे गटाने मिळवलेले यश हे महत्त्वाचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (Prakash Ambedkar)
मुंबईतील निकाल पाहता मुंबईकर हे महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाच्या मागे उभे असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे आभार मानले आहे. आभार मानत असताना उद्धव ठाकरे यांनी दलित आणि बौद्धांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याने आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विट करत सुनावलं आहे.
प्रकाश आंबेडकरांचं ट्विट
‘गरज सरो वैद्य मरो’चे उत्तम उदाहरण – उच्च वर्णीय हिंदू नी भाजपा ला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचवण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलीत आणि बौद्धांने आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही!, असं ट्विट आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.
‘गरज सरो वैद्य मरो’चे उत्तम उदाहरण –
उच्च वर्णीय हिंदू नी भाजपा ला मतदान केले आणि उबाठा शिव सेना किंवा महा विकास आघाडीला नाही.ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले.
पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या… pic.twitter.com/Qo2xEbBDq7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 17, 2024
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केलं. ज्यामध्ये मराठी होते, हिंदू होते, मुस्लीम होते आणि ख्रिश्चन देखील होते, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यात दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख केला नसल्याने सोशल मीडियावर अनेकजण नाराजीच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Prakash Ambedkar)
ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन उमेदवार विजयी झाले होते. या मतदारसंघातून बौद्ध आणि दलितांनी भरभरून मतदान केलं आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एक्स फॅक्टर ठरला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. या पराभूत नेत्यांमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा समावेश होता. यंदा संभाजीनगरमध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे विजयी होतील अशी शक्यता होती. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भूमरेंनी विजय मिळवला असून ते खासदार झाले आहेत.
News Title – Prakash Ambedkar Slam To Uddhav Thackeray Over Not Giving Loksabha Credit To Dalit And Buddhist
महत्त्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांनी खायचे तरी काय?, फळभाज्यांचे किलोचे दर शंभरी पार; पालेभाज्याही महागल्या
‘सेक्स, सेक्स, सेक्स’; अनिल कपूरच्या उत्तराने करण जोहरला पण बसला धक्का!
‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
शेतकऱ्यांनो स्मार्ट शेती करण्यासाठी हे 3 सोलर उपकरणे वापरा; खर्च होईल कमी
बकरी ईदनिमित्त आज पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?