‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अकोला | दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
दीपाली चव्हाण यांची आत्महत्या वाघ आणि साग तस्कारांमुळे तर झाली नाही ना याचा शोध घेण्याची गरज असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने लक्ष घातलं पाहिजे तसं झालेलं नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
कार्यालयीन त्रास दिल्याने दीपालीने आत्महत्येचा निर्णय घेतलाय असं वरवर दिसतंय. परंतु या प्रकरणाचा खोलतपास केला तर धारणी आणि मेळघाटमधील वाघांची संख्या कमी होतेय. त्यामागील कारणं सापडली जाऊ शकतात. या भागात सागाची चोरी होतेय. ही चोरी मध्य प्रदेशच्या बाजूने होतेय. त्यातील भानगडी देखील या तपासत बाहेर येऊ शकतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
दरम्यान, ज्यांनी दीपालीवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता त्यांची आर्थिक परिस्थिती, ते काय करतात, त्यांचा आणि वनविभागाचा काय संबंध आहे का? याबाबतचा खुलासा सरकारने करावा. सरकारने हा खुलासा केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या प्राध्यापक निशा शेंडे त्या अमरावतीतून सर्व माहिती जाहीर करतील, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
कोरोना लसीबाबत चिंता वाढवणारी बातमी; जगभरातील तज्ज्ञांच्या सर्व्हेने एकच खळबळ
पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी; व्हिडीओ तुफान व्हायरल
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, कोरोना चाचण्याचे दर केले कमी
पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!
Comments are closed.