बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”

पुणे | परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी राज्य सरकारच बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं, अशी आमची मागणी आहे. सोमवारी दुपारी वंचितचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ही मागणी करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट व अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मधील क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडवून आणू शकतात याचे चित्र आपण पाहात आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी शंभर कोटी रुपये कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते- देवेंद्र फडणवीस

“साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग”

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका; स्वत: ठोकर खाल्लेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More