बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात, अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

रेमडेसिवीरच्या तुटवड्यावर अजित पवार म्हणतात की रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?, असा सवाल देखील प्रकाश अंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात तयार होणारी लस आपल्या सर्वांना जवळपास 1200 रुपयांना लस मिळणार आहे. हे चुकीचं असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत. ही लस आम्हाला सरकारला 150 रुपयात मिळावी, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लॉक डाउनमधून ही चेन मोडणार नाही. त्याऐवजी जो पहिला रुग्ण आढळतो. तो किती जणांना भेटला आणि ती व्यक्ती पुढे किती लोकांना भेटली. यांच्यावर कामावर करणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. जर तसं केलं तर चेन तोडणं शक्य होईल, असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आयपीएलमधील या संघाला मोठा धक्का! या भारतीय खेळाडूने घेतला स्पर्धा सोडण्याचा निर्णय

कौतुकास्पद! युवा गोल्फपटूने कोरोना लसीकरणासाठी दिली आतापर्यंतची सर्व कमाई

इंजेक्शन-औषध मिळत नाहीत?, #MahaCovid हॅशटॅग वापरुन एक ट्विट करुन पाहा

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला’; प्रविण तरडेंना अश्रू अनावर

गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More