“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Eknath Shinde l राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप आलेच. अशातच आता लोकसभा निडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाले आहेत. प्रकाश आंबेडकर हे नेहमीच त्यांच्या खास शैलीत मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत रोखठोक शैलीत समाचार घेत असतात. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले? :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं यांचं काम आता संपलं आहे असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोली येथे डॉ. बी. डी. चव्हाण यांची प्रचारसभा घेतली आहे. या प्रचारसभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर टीका केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 ला पुन्हा सत्तेत आले तर आता निवडणूका होणारच नाहीत. देशाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून जाईल. जो कोणी ऐकणार नाही त्याला तुरुंगात डांबल जाईल. मोदी सत्तेत आल्यास सीएए आणि एनआरसी कायदे लागू करतील. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी देखील ते संविधान बदलू शकणार नाहीत अशी ग्वाही दिली जात आहे. मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास ते घटना बदलल्याशिवाय राहणार नाही. हे बदलायचं असेल तर मोदींच्या विरोधात मतदान कारण गरजेच आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Eknath Shinde l दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे देखील दिसणार नाहीत :

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम आता संपलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी तुम्हाला एकनाथ शिंदे देखील दिसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा म्हणावा तसा फायदा लोकसभेला दिसला नाही तर वेगळं चित्र दिसू शक्यता आहे असं प्रकाश आंबेडकर प्रचार सभेवेळी म्हणाले आहेत.

याशिवाय प्रकाश आंबेडकर त्यांच्या भाषणात म्हणाले की 17 लाख कुटुंबांनी देश सोडला आहे. हे लोक मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत तर हिंदूच आहेत. त्यांची मालमत्ता 50 कोटी आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विचारतो असा प्रश्न विचारतो आहे की, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना मतं द्यायला सांगत आहात? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? असा रोखठोक हल्लाबोल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

News Title – Prakash Ambedkar Statement On Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या – 

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे फेकली वस्तू, नेमकं काय घडलं?