प्रकाश आंबेडकरांनी भाजपला पाठिंबा द्यावा- रामदास आठवले

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला पाठिंबा द्यावा, त्यांचा फायदा दलितांना होईल, असं आवाहन सामाजिक  न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.  

प्रकाश आंबेडकर कायम आडमार्गाने भारतीय जनता पक्षालाच मदत करत असतात, तर त्यांनी थेट भाजपला पाठिंबा द्यावा. त्याचा फायदा दलितांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताकद आपण दोघे मिळून वाढवू, असं आठवले म्हणाले.

एमआयएमबरोबर प्रकाश आंबेडकर गेल्यास त्याचा फायदा निश्‍चितच भाजपला होणार आहे. कॉंग्रेसनेच या युतीची काळजी करण्याची गरज आहे, असं आठवले म्हणाले.

दरम्यान, रामदास आठवले यांच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-देशासाठी भाजप आणि संघाच्या नेत्यांचा कुत्राही मेला नाही!

-सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव; तर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचा बादशहा!

-पृथ्वीसाठी ही व्यक्ती आहे खास; पहिलं शतक ‘या’ व्यक्तीलाच केलं अर्पण!

-…या कारणामुळे बाद झाल्यानंतरही पृथ्वी शॉ मैदानात थांबला होता!

-शरद पवारांचं राजकारण कोणीही ओळखू शकत नाही- नितीन गडकरी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या