पुणे महाराष्ट्र

कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही- प्रकाश आंबेडकर

पुणे | राज्यात वाहतुकीची इतर साधने सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं दिसत आहे. त्यामुळे कोरोनानंतर फार मोठा बदल होईल, असं मला वाटत नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचं आवाहन केलं. 1 जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो. जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचं महत्व कायम राहील, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाही. लोकं सांगतात आणि शासन निर्णय घेते. सरकार केवळ आदेश काढण्याचं काम करत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

“आमच्या फायद्यासाठी कायदे आणलेत म्हणता, मग ते मागे घेतल्याने कुणाचं नुकसान होणार आहे?”

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर …- उद्धव ठाकरे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘या’ तारखेपासून 17 नंबरचा अर्ज भरता येणार!

औषध आणि काळजी हाच नववर्षाचा मंत्र- नरेंद्र मोदी

‘बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचं नामकरण व्हायला हवं’; भाजप खासदाराची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या