सांगली | राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बंडखोरी आहे, ते घटनाबाह्य आहे, त्यामुळे केंद्र सरकार कदाचित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकते, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
सरकार काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, त्यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाली नाही, आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या, तरी त्यांनी त्या दिल्या नव्हत्या, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
ऐन निवडणुकीत हॉलिडे मूडमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीचं कल्याणच होणार, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.
आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत, शहीद होऊ पण…- संजय राऊत
‘उद्याचं चित्रं सांगण्याचा त्यांचा हा गुण माहीत नव्हता’; शरद पवारांचा दानवेंना टोला
“त्यांचे बाप नव्हते तेव्हापासून भाजपमध्ये काम केलं, आता आयत्या पिठावर रेघा मारत आहेत”
शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!