बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

कोल्हापूर | मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकलं गेलं. या आंदोलनात संभाजीराजे यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर देखील सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका. पण केंद्र सरकारने केलेली 102 वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवं असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावं लागेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आवताण दिले आहे, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदींसमवेत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही तयारी करून जाणार आहोत, असं खा. संभाजीराजे म्हणाले.

कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये 21 जूनला मूक आंदोलन करण्याचं नियोजन आहे. त्यापूर्वी आजच्या चर्चेत आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असं संभाजीराजे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय?”

संभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे!

भाजपला मोठा धक्का?; 25-30 आमदार अन् 2 खासदार भाजप सोडण्याच्या तयारीत?

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More