औरंगाबाद | माझ्या हातात सत्ता द्या, सरसंघचालक मोहन भागवतांना दोन दिवसांसाठी जेलमध्ये टाकतो, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. शस्त्र बाळगूनही भागवतांना मोकळीक दिल्याने प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोणाकडे जर बंदूक सापडली तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग मोहन भागवतांकडे शस्त्र असतात. तर त्यांना मोकळीक का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते औरंगाबादमध्ये मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.
कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. त्यामुळे मला तुम्ही जर सत्ता दिलीत तर मी भागवतांना जेलमध्ये टाकेन, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीही मोहन भागवतांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-जितेंद्र आव्हाड यांची राहुल गांधींना ‘ही’ कळकळीची विनंती…
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं रोखठोक प्रत्युत्तर!
-“…तर भारत बालाकोट एअर स्ट्राईकहून मोठा हल्ला पाकव्याप्त काश्मिरमध्ये करेल”
-शरद पवारांचा ‘हा’ अत्यंत विश्वासू सहकारी राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत?
-मुख्यमंत्र्यांविरोधातील काँग्रेसची पोलखोल यात्रा ‘या’ कारणामुळे लांबणीवर
Comments are closed.