नागपूर | कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही पाठींबा दर्शवत ते दिल्लीला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते.
मंत्रिमंडळातील नेतेमंडळींना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाहीतर आंदोलन करच रहा. मात्र मी जर मुख्यमंत्री असतो तर राजीनामा घेतला असता, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकारने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र तो फक्त तोंड देखला आहे. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील का कायदा करत नाही?, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी अधिवेशनावरूनही त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, अधिवेशनाचे दोन दिवस कांजूरमार्ग आणि कंगनावर गेले. शेतकऱ्यांना वेळच नाही. अधिवेशन नाही तर आम्ही काय करायचं?, असं सांगितलं जातं, असं आंबेडकर म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…
शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना
कोरोनाची लस घेतल्यावर ‘इतके’ दिवस मद्यपान करता येणार नाही!
“उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, भविष्यातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शिवसेना”
मला केंद्रात मंत्रिपद मिळालं तरी…- सुजय विखे-पाटील