“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”
मुंबई | देशात 1 मार्चपासून कोरोना लसीच्या तिसऱ्या लसीकरणाच्या टप्प्याला सुरूवात झाली. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनाची लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस घेतल्याची माहिती आहे. दिल्लीच्या एम्स रुगणालयात त्यांनी लस घेतली आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका वेगळ्याच मुद्य्यावरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींनी लस घेतल्याबाबत आपल्या ट्विटरवरून माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी आपला लस घेतानाचा फोटोही पोस्ट केला. त्यात नरेंद्र मोदींसोबत दोन नर्स दिसत आहेत. याचाच धागा पकडत प्रकाश आंबेडकरांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनाही ट्विट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज हिंदू निष्ठेचे ढोल बडवतात पण हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली, काय वागणं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींना लस देणाऱ्या ज्या दोन परिचारिका होत्या त्यामधील एका परिचारिकेचं नाव पी. निवेदा आहे तर दुसऱ्या परिचारिकेचं नाव रोसामा अनिल असं आहे.
दरम्यान, पी. निवेदा या पुद्दुचेरीच्या आहेत तर रोसामा अनिल या केरळच्या आहेत. नरेेंद्र मोदींनी लस घेताना आपल्या तोंडाला मास्क न लावल्याने त्यांना सोशल माध्यमांवर ट्रोल कऱण्यात येत आहे.
Prime Minister Narendra Modi, day in an day out drums Hindu loyalty but does not believe in Hindu nurses, hence took the vaccine jab from Christian nurse, what a behaviour
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 1, 2021
थोडक्यात बातम्या-
बाबो! खेळाडूने हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा व्हिडीओ
“इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”
‘मुंबईतील त्या दिवशीच्या ‘बत्तीगुल’मागे चीनचा हात?’; ऊर्जा मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
देशातील ‘या’ 6 शहरांमध्ये रंगणार आयपीएलचा थरार
दम लगा के हैशा! मेरोलिनच्या पुशअप्स चॅलेंजवर राहुल गांधींचा दस का दम, पाहा व्हिडीओ
Comments are closed.