बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…मग शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय फरक राहिला??”

औरंगाबाद  | सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पवारांना लक्ष्य केलं आहे. मंगळवारी  सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकर घेतली.

धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची हमी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देत असतील तरच आंदोलन करण्यात अर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलकांना वेठीस धरलं तसं पवार आम्हाला वेठीस धरतील तर मग पवार आणि मोदी यांच्यात फरक काय राहिला?, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

राज्याचा आढावा घेऊन वंचित 21 जानेवारी रोजी जिंकलेल्या जागांची आकडेवारी जाहीर करणार असून अकोला जिल्ह्यात 80 टक्क्यांपेक्षा जास्त जागा वंचित बहुजन आघाडीने जिंकल्या असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.

दरम्यान, 1857च्या बंडात इंग्रजांना शरण न गेलेल्या जमातींची गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात आली. 1957पर्यंत ही नोंद कायम होती. त्यात शिकलकरी समाजाच होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. राज्यात साडेतीन लाख शिकलकरी असून सरकारी जमिनीवर त्यांचे पुनर्वसन करावं, अशा मागणी आंबेडकर यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात भाजपसाठी धोक्याची घंटा; ‘या’ कारणामुळे नगरसेवकांवर ठेवला जातोय वॉच?

मराठा आरक्षणावर आज होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी!

प्रेमविवाह करणारांसाठी खूशखबर; उच्च न्यायालयानं दिला सर्वात मोठा निर्णय!

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन- अतुल भातखळकर

काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहिला गरीब- प्रकाश जावडेक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More