बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घ्या”

मुंबई | महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुढे ढकलण्यात आली आहे. आधीच कोरोनामुळे परीक्षा मागील वर्षापासून लांबणीवर पडल्या होत्या. मात्र राज्य सरकारने पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवर टीका होत आहे. यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं जात आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय ओबीसी, एससी, एसटी या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कोरोना वाढत असल्याचं कारण दिले आहे. परंतु हा निर्णय म्हणजे ओबीसी, एससी आमि एसटी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. राज्य शासन श्रीमंत मराठ्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याआधी भाजप नेते नितेश राणेंनीसुद्धा यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान,  एमपीएससीच्या परीक्षा परत पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेला बसणाऱ्या मुलांचे वय वाढत चाललं आहे. मुलांचे वय कसं कमी करणार?, यांची मुलं परीक्षेला बसली नाही म्हणून वाटेल ते निर्णय घेत आहेत. फक्त एमपीएससी परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही?, अशी उपरोधिक टीका नितेश राणेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ ठिकाणी घेतली कोरोनाची लस

मोठी बातमी! कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लॉकडाऊनची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More