बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वंचित’मध्ये मोठी फूट; दोन माजी आमदारांसह 48 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुंबई | प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे. कारण अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह राज्यभरातील 48 पदाधिकाऱ्यांनी शनिवारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

सर्व पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा पत्र प्रकाश आंबेडकरांना दिलं आहे. पक्षातील विश्वासार्हता संपली आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण राजीनामा देत आहोत, असा उल्लेख यात करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत 41 लाख तर विधानसभा निवडणुकीत 24 लाखांपेक्षा अधिक मतं वंचित बहुजन आघाडीनं मिळवली होती. मात्र, आता पक्षात मोठी फूट पडली असून हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार या दोन माजी आमदारांसह 48 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेना या प्रस्थापित आघाड्यांना टक्कर देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने तिसरी आघाडी उघडली होती. मात्र, लोकसभा किंवा विधानसभेमध्ये वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीसच महाविकास आघाडीचे जनक- शिवाजी आढळराव पाटील

संघाच्या अंगणात जाऊन चंद्रशेखर आझाद यांचं संघप्रमुखांना ओपन च‌ॅलेंज

महत्वाच्या बातम्या- 

“तृप्ती देसाई शांत बसा, नाहीतर आता तोंडात शेण घालू”

वारिस पठाण हे औरंगजेबाचे ‘वारिस’; सुधीर मुनगंटीवारांनी बोचरी टीका

खेडला विमानतळ होत असेल तर माझा पाठिंबाच- आढळराव पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More