मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आगामी लोकसभेसाठी 12 जागांच्या आपल्या मागणीवर भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ठाम असल्याचं कळतंय. त्यामुळे ते महाआघाडीत सामिल होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 12 जागांची मागणी केली होती. त्यावर काँग्रेस त्यांना 6 जागा सोडण्यास तयार आहे, अशीही माहिती होती.
काँग्रेस जर आम्हाला 12 जागा देण्यास तयार नसेल तर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात 48 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत तरी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यास उत्सुक आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत!
-कांद्याच्या भावासाठी आता शिवसैनिक-शेतकरी रस्त्यावर; महामार्ग रोखून धरला…
-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ‘यांची’ नावं सर्वाधिक चर्चेत!
–युती व्हावी म्हणून गिरीश महाजनांची निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना
-अजित पवारांनी सांगितली 12 कोटींच्या रेड्याची गोष्ट, उपस्थितांमध्ये एकच हशा…