राज्यातील सत्तासंघर्षाबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा!

मुंबई |  राज्यातील सत्तासंघर्षाबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा केला आहे. आमदारच अपात्र होणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी आला तर सुप्रीम कोर्टाला कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही. कोर्टाच्या निर्णयातून कोणी अपात्र होईल असं वाटत नाही, असं त्यांनी म्हटलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांनी घेतलेला निर्णय हा योग्य की आयोग्य यावर कोर्ट भाष्य करू शकत नाही. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यपालांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले जातील. पण त्यांचा निर्णय फिरवला जाऊ शकेल असं वाटत नाही. कारण ती घटना घडून गेली आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली. मतदानासाठी सभागृह बोलावण्यात आले होते. पण त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-