बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजीराजेंसोबतच्या भेटीत प्रकाश आंबेडकरांचं शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य

पुणे | भाजपचे खासदार संभाजीराजे भोसलेेंनी मराठा आरक्षणासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांचं राजकारण मी 40 वर्षापासून जवळून पाहत आलोय. ते नरो वा कुंजरो वाच्या भूमिकेत असतात. शरद पवार लवकरच आरक्षणाबाबत भूमिका घेतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी दोन मार्ग असल्याचं म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं म्हणजे ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, राज्यातील अनेक पक्षाच्या नेत्यांना भेटलो आहे. शेवट प्रकाश आंबेडकरांकडूनच केला आहे. आता राज्यातील मुख्यमंत्री, प्रमुख नेते आणि खासदार यांच्यासोबत लवकरच दिल्लीत गोलमेज परिषद घेणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

वर्षभराचा चारा जळून खाक, कृषी पदवीधर युवाशक्तीचा शेतकऱ्याला मदतीचा हात!

लस द्यायला आलं पथक, आज्जीबाईचा चढला पारा, व्हिडीओ जोरदार व्हायरल

बाॅलिवूडवर शोककळा! ‘इंदू की जवानी’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं कोरोनानं निधन

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजेंबरोबर जायला तयार”

“ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More