बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे खरं आहे का?”, शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ

मुंबई | शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. अशात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विट मुळे खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावं आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का?, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकरांनी शिंदे गटाला विचारला.

शिवसेनेला मोठं खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांनी सरकारला हादरा दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून फडणवीस आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव बंडखोर आमदारांना दिला असल्याची माहिती मिळते आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देखील दिल्याचं कळतंय.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावर बोलताना, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही, याअगोदर सुद्धा त्यांनी अशीच चित्रविचित्र वक्तव्ये केली आहेत. शिवसेनेचं सध्या जे काही सुरु आहे, तो त्यांंचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. तसेच भाजपची भूमिका स्पष्ट आहे, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून आता आमच्यासोबत येत आहेत एकनाथ शिंदे”

शिवसेेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना!

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More