Loading...

लोकसभा निवडणुकीबाबतचा प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

अमरावती : गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘एमआयएम’सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,  असं म्हणत  एमआयएम सोबतची युती तुटल्याची कबुली आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी आंबेडकरांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

Loading...

लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देणार, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यात आले असता बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंचित आघाडी सत्तेवर येणार या भीतीने विरोधी पक्षातील नेते भाजपत प्रवेश करत असल्याचा टोलाही आंबेडकरांनी यावेळी लगावला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...