Top News नागपूर महाराष्ट्र

डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबावर ओढावलं आणखी एक संकट

नागपूर | ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्याडॉ. शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली. या धक्क्यातून सावरत नाही तर आमटे कुटुंबियांवर आणखी एक संकट ओढावलं आहे.

प्रकाश बाबा आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे आणि त्यांचा मुलगा अनिकेत आमटे या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे.  या दोघांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. मंदाकिनी आमटे आणि विकास आमटे आता क्वारंटाईन झाले आहेत.

महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवला जातो. प्रकल्पाचा कारभार प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबातील बाकीचे चालवतात. यामध्ये हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक म्हणून प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आमटे काम पाहतात.

दरम्यान, कोरोना झाल्यामुळे अनिकेत आमटे आणि मंदाकिनी आमटे या आराम करणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामात ते काही दिवस लक्ष घालणार नाहीत.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांनी तुुम्हाला विश्वासाने परत सत्ता दिली मात्र बळीराजाच्या विश्वासाला केंद्राने तडा दिला”

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!

दिलीपकुमार यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा- सायरा बानो

कोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…”

‘भारत बंद’ला अनेक राजकारण्यांचा पाठिंबा मात्र आंदोलनस्थळी राजकारण्यांसदर्भात मोठा निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या