नागपूर महाराष्ट्र

भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली; प्रकाश गजभियांचा आरोप

नागपूर | भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. गजभिये यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर विद्यमान सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देणार होतं. मात्र लोकसभा निवडणुका संपत आल्यावर सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्या प्रवेशामध्ये आरक्षण मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं. ही मराठा समाजाची फसवणूक असल्याचं गजभिये यांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांसाठी अतिरीक्त जागा निर्माण करू, असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं होत. मात्र प्रत्यक्षात तेवढ्या जागा वाढवून देणं शक्य नाही, असं गजभिये यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार नुसत्या भूलथापा देण्याचं काम करत आहे, असा टोला आमदार गजभिये यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

-“पवारांनी मतदान केलं तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, मग त्यांचं मत कमळाला कसं गेलं?”

-“मोदींचे काम नव्या वधुसारखे; काम कमी, बांगड्यांचा आवाजच जास्त”

-“नरेंद्र मोदींनी सामान्य जनतेवर ‘अन्याय’ केला, काँग्रेस पक्ष ‘न्याय’ करेल”

-मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले- मनसे

-आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या