बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ आमदारानं पोलिसाच्या वर्दीत केली विधानभवनात एन्ट्री

मुंबई | राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी पोलिसाच्या वर्दीत विधानभवनात एन्ट्री केली आहे.

प्रज्ञाच्या शापाने मरण पावलो ही अंंधश्रद्धा आहे मी तर देशासाठी शहिद झालो, असं लिहीलेलं फलक गजभिये यांच्या हातामध्ये यावेळी दिसून आलं.

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहिद हेमंद करकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. साध्वींच्या त्या टीकेचा निषेध करत गजभिये पोलिसांच्या वर्दीमध्ये विधानभवनात दाखल झाले होते.

दरम्यान, गजभिये अधिवेशनात प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पोशाखात येत असतात.

महत्वाच्या बातम्या

-“चंद्रकांत पाटलांनी बारामतीतून निवडणूक लढवून दाखवावी”

-विद्यार्थ्यांना दिलासा; अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाही’

-मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा आदेश; अन् चंद्राबाबूंचा बंगला उद्ध्वस्त

-“रस्त्यावर नमाज चालतो मग हनुमान चालीस का नाही?”

-सलमान खानच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणामुळे पुन्हा चढावी लागणार न्यायालयाची पायरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More