बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रकाश जावडेकरांचा पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

नवी दिल्ली | मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर खंडणीचे आरोप केले आहेत. या प्रकरणानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘पोलिसांकडून पैसे गोळा करा, लुटा आणि वसुली करा हा एकमेव महाराष्ट्र सरकारचा कार्यक्रम आहे’, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत  केली आहे.

प्रकाश जावडेकर यांनी सचिन वाझेचा शिवसेनेशी कसा संबंध आहे, यासंबंधीतला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओही यावेळी दाखवला आणि महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार असल्याची टीका त्यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. राज्याबरोबर केंद्रातील भाजप नेत्यांनीही या प्रकरणात ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

थोडक्यात बातम्या –

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

मोठी बातमी! मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार

‘पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर’; सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

भाषण चालू असताना अजित पवारांना चिठ्ठी आली, ‘दादा मास्क काढा’; अजित पवार म्हणाले…

‘…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात देऊन टाका’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More