बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, केंद्राची कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली”

मुंबई | महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कामाचा लेखाजोगा मांडण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या 2 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप व सत्ताधारी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडीला 2 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी गेल्या 2 वर्षात केंद्र सरकारने केलेली कामंही आपल्या खात्यात मांडली’, असा घणाघाती हल्ला प्रकाश जावडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

दरम्यान, जावडेकर यांनी महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार संधीसाधू असल्याची खोचक टीका केली आहे. आज सकाळपासूनच महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आता प्रकाश जावडेकरांनीही उडी घेतली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वेळापुर्वीच महाराष्ट्रात सत्तेत असलेलं हे सरकार महाघोटाळा आघाडी सरकार असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता प्रकाश जावडेकर यांनी मी या सरकारला नवं नाव देतोय, असं म्हणत हे महाविश्वास घातकी सरकार असल्याचा टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको- नरेंद्र मोदी

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

भय्यू महाराज प्रकरणी धक्कादायक खुलासा, चॅटपाहून पोलिसांनाही बसला धक्का

“पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More